Home Cities चोपडा चोपडा कॉलेजच्या जयेश गाडीलोहारचा सीओईपीला प्रवेश

चोपडा कॉलेजच्या जयेश गाडीलोहारचा सीओईपीला प्रवेश

0
103


WhatsApp Image 2019 07 28 at 7.41.03 PM

चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा  गांधी शिक्षण मंडळ संचलित कला , शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचा १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी विविध नामांंकित    महाविद्यालयांंमध्ये प्रवेश मिळविला  आहे.

यात जयेश बापू गाडीलोहार याने एमएचटी सीईटी परीक्षेत ९९.६० पर्सेंटाईल मिळवून कॉलेज आफ इंजिनियरिंग पूणे या नामांकित महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेला प्रवेश मिळविला आहे . दुर्वेश नरेश पाटील याने ९८.५१ पर्सेटाईल मिळवून वालचंद इंजिनियरिंग कालेज सांगलीला प्रवेश मिळविला आहे. जिवनदिप मंगल पाटील याने ९७.९३ पर्सेंटाईल मिळवून व्हीआयआयटी पुणे येथे प्रवेश घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील , अध्यक्ष अॅड संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा सौ आशा विजय पाटील , सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. डी.ए. सुर्यवंशी, उपप्राचार्य प्रा डॉ. ए.एल. चौधरी , प्रा. एम. बी. हांडे, डॉ. के. एन. सोनवणे, ज्यु कॉलेज उपप्राचार्य प्रा. बी. एस. हळपे , पर्यवेक्षक प्रा. व्ही. वाय. पाटील व रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound