चोपडा, प्रतिनिधी | जिल्हास्तरीय कलाउत्सव २०१९ या स्पर्धेत चित्रकला व तबलावादन या कलाप्रकारात विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लिपिका सचिन पाटील व सृष्टी पुनमचंद जैन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या चोपडा तालुका सोबत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे संचलित व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्यावतीने कलाउत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात लिपिका सचिन पाटील व सृष्टी पुनमचंद जैन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून श्रेयस नरेंद्र भावे हा विद्यार्थी उपविजेता ठरला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते तर त्यांना सहकार्य उपशिक्षक आनंद पाटील, पवन लाठी, भरत बारी यांनी केले.चो पडा तालुका गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, केंद्रप्रमुख युवराज पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकले आहेत. यासर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रवींद्र जैन, विश्वस्त मंगला जोशी, सुधाकर केंगे, नरेंद्र भावे, वासंती नागोरे, संजय सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालकवृंद, ललित केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, अ.म.रा.शै. कलाशिक्षक संघ सरचिटणीस शालिग्राम भिरूड, कलाध्यापक संघाचे पदाधिकारी एन.ओ.चौधरी, अरुण सपकाळे, प्रल्हाद सोनार, दिनेश बाविस्कर, ए.पी.पाटील यांनी केले.