स्वातंत्र्यानंतर चिंचखेड्यात पहिल्यांदा धावली लालपरी

pachora lalapari

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील तालुक्यातील चिंचखेडा (गलवाडे) येथे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षानंतर प्रथमच एस.टी. महामंडळाची बस धावली असून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाल्याची भावना गावकाऱ्यासह प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या व पाचोरा तालुक्याच्या सिमेवर वसलेले चिंचखेडा बु हे गाव स्वातंत्र्यकाळापासून विकासापासून वंचित असल्याची गावकऱ्यांची भावना होती. या ठिकाणी दळणवळणाची चांगली सुविधा नव्हती, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शिक्षण आरोग्य सेवा यासह शासनाच्या विविध प्रकारच्या योजना येथे पोहचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यातच पाचोराहून अवघे ११ किलोमीटर लांब असलेल्या या गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने बसची सुविधा देखील मिळाली नव्हती. त्यामुळे याची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या गावासाठी तारखेडा ते चिंचखेडा हा ३ कोटी २१ लाख रुपयांचा ५ किलोमीटर अंतर असलेला डांबरी रस्ता मंजूर करून पक्का रस्ता झाल्याने चिंचखेडा ग्रामस्थांचे पाचोरा येण्यासाठी मराठवाड्यातून येवून साधारण २० रुपये खर्च करून यावे लागत होते.

आज प्रथमच लालपरी गावात आल्याने चिंचखेडा ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला तर आमदार किशोर पाटील याचे आभार मानले. यावेळी आगार व्यवस्थापक वाणी, एस.टी. महामंडळाचे बेहरे बसचे चालक-वाहक याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा भडगाव शिवसेना संर्पक प्रमुख सुनील पाटील. अँड. दिनकर देवरे, जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, स्वीय सहायक राजेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, वाघ गुरुजी, अजय पाटील, भरत खंडेलवाल, आर.आर.पाटील, तारखेडा सरपंच अरुण पाटील, पोपट पाटील, अर्जून पाटील, शांताराम पाटील, फुलचंद पाटील, गोकुळ पाटील, नाना पाटील, सागर पाटील यांच्यासह शालेय विद्यार्थी पालक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने या गावातील जनतेची मूलभूत सुविधा सोडवली नव्हती,मात्र मा. मुख्यमंत्र्यांच्या ग्रामसडक योजनेतून मी हे काम मजूर करून प्रत्यक्ष गावकऱ्यांना एस.टी ची सुविधा मिळवून दिली आहे,जे विकास काम माझे आहे तेच मी सांगणार ‘आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे माझे काम नाही, मी जनसेवेसाठी जे बोलतो ते करतोच’
                    – आ.किशोर पाटील

Protected Content