मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज, मंगळवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यात मुंबई बाहेर सोलापूर शहरात येथील होम मैदानावर होणारा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रचार व प्रसाराचा प्रमुख कार्यक्रम होता. आता हा कार्यक्रम देवेंद्र फडणीवस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या प्रचार-प्रसारात सतत व्यस्त असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘ओव्हर एक्सर्शन’ मुळे आज मगळवारी सकाळी तब्येत बिघडल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझु यांचा चार दिवसांचा भारत दौरा सुरू झाला आहे. मुईझु हे त्यांच्या शिष्टमंडळ समवेत दिल्लीहून आज मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुईझु यांच्या स्वागतार्थ राजभवन येथे आयोजित स्नेहभोजनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानंतर मुंबई शहरात कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तो आज रद्द करण्यात आला आहे.