उंटावद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छोटु भिल्ल तर उपसरपंचपदी भावना पाटील

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पँनलचे छोटू भिल तर उपसरपंचपदी उंटावद विविध कार्येकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत पाटील यांच्या अर्धांगीनी भावना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचीत ग्रा.प.सदस्य त्रिवेणाबाई सपकाळे, डिगंबर सपकाळे, शोभाबाई पाटील हे या सभेस उपस्थीत होते तर सरपंच व उपसरपंचासह सर्व सदस्यांचे माजी सरपंच भाऊराव पाटील व तंटामुक्त गाव समीतीचे अध्यक्ष रामचंन्द्र सपकाळे, प्रा.विश्वनाथ पाटील, सुधाकर पाटील, युवराज पाटील, दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील, त्र्यंबक पाटील, विजय पाटील, साहेबराव पाटील, रविंन्द्र पाटील, जुलाल पाटील, सुनिल  कोळी, विवेक पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, जगदीश पाटील, किशोर सपकाळे, भिकन पाटील, समाधान पाटील, पांडुरंग पाटील, कल्पेश पाटील, मुकेश पाटील, शाम भिल इ.सह वि.का.सोसा.व दुध डेअरीच्या चेअरमन व संचालख मंडळ यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. या निवडणूकीसाठी प.स.चे कृषी विस्तार अधीकारी डी.पी.कोते ,तलाठी निखील मिसाळ कोतवाल, ज्ञानेश्वर साळुंके, ग्राम सेवक गुरूदास चौधरी यांनी काम पाहीले.

Protected Content