नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच फोटो हवा ! : राणेंची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नोटांवर आता नेमका कुणाचा फोटो हवा ? यावरून दावे-प्रतिदावे केले जात असतांना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील आपली मागणी सादर केली आहे.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच देशातील चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबतच लक्ष्मी आणि श्रीगणेशाचे फोटो हवेत अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले आहे. आगामी निवडणुकांच्या आधी आपने या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मानले जात आहे. यानंतर कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी महात्मा गांधी यांच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हवा अशी मागणी केली आहे.

 

यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हवी अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले असून यात शिवरायांची प्रतिमा असणारी दोनशेची नोटी देखील शेअर केली आहे. याला ये परफेक्ट है ! असे कॅप्शन देखील देण्यात आलेय.

Protected Content