सुर्यभान महाराज शेळगावकरांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ह. भ. प. सुर्यभानजी महाराज शेळगांवकर महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध किर्तनकार यांना निसर्गमित्र समिती धुळे च्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बालकिर्तनकार म्हणुन महाराजांनी संपुर्ण राज्यात प्रसिद्धी प्राप्त केली असुन, जळगांव जिल्ह्यातील जळगांव तालुक्यातील तापी तिरावर बसलेल्या शेळगांव गावात ह. भ. प. सुर्यभान महाराज यांचा जन्म झाला. आई वडील शेतकरी बालपणापासुन महाराजांना पर्मार्थाची आवड संत कृपा झाली इमारत फळा आली संबंध महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यांपर्यन्त वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन आपल्या कथा किर्तनातुन महाराज ज्ञानप्रबोधन करतात.

नुकताच राजश्री शाहू महाराज नाटयगृह धुळे येथे प्राचार्य बी. एस. पाटील, आर. डी. पाटील, उद्योजक रावसाहेब परशुराम देवरे, उद्योजक दिपक भैय्या पाटील, निसर्ग मित्र समिती या संस्थेचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ह. भ. प. सुर्यभान महाराज यांना अगोदर देखील महाराजांना शब्द प्रभुधर्म भुषण पुरस्कार प्राप्त आहेत. साधु संप्रदायातर्फे महामंडलेश्वर हे पद सुद्दा प्राप्त आहे. ह. भ. प. सुर्यभान महाराजांचे जिवन गोमातेला समर्पित आहे संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थान व गोरक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराज आपल्या किर्तनातुन वृक्ष वल्ली आम्हां सोयरे या प्रमाणाद्वारे झाडे लावा झाडे जगवा वृक्ष सुद्दा त्या सावळ्या विठुरायाचे स्वरूप आहेत. प्रत्येक जिवाला वृक्ष वेलीच्या रूपात जन्म घ्यावा लागतो, असे ज्ञानप्रबोधन करीत असतात वारकरी संप्रदायतील अशा या निष्काम कर्म योग्याला महाराष्ट्र भुषण छत्रपति शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिति धुळे यांनी महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. उत्तर महाराष्ट्रात कमी वयात पुरस्कार प्राप्त करणारे महाराज पहिलेच किर्तनकार आहेत महाराजांचे संबंध वारकरी संप्रदायत कौतुक होत आहे

Protected Content