मुंबई , लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची ऑफर नाकारत राज्यातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली. त्यांनतर राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला असून शिवसेनेतर्फे सहाव्या जागेसाठी ४ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा असे आवाहन केले होते. तर अगोदर मातोर्श्रीवर या शिवबंधन बांधा मगच उमेदवारीचा विचार करू, असा पक्षवाढीसाठी विचार करत छत्रपती संभाजीराजेना ऑफर होती. ती ऑफर छत्रपती संभाजीराजेनी नाकारत, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. खासदारकी साठी मी अगतीकही नाही. शिवशाहू यांचे विचार मराठा आणि बहुजन समाजासाठी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून मी कार्य करत राहणार असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीसह कोणत्याही पक्षाने पाठबळ द्यावे अशी माझी भूमिका आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. सोमवार दुपारपासूनच शिवसेनेतर्फे चार जणांची नावे चर्चेत असून यात शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार, औरंगाबादचे माजी खा. चंद्रकांत खैरे, शिरूरचे माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर यांचा समावेश आहे. यातून एका नावाची शिफारस होऊन राज्यसभेवर संधी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.