धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात रोहिणी अतुल देशमुख (रा.अनोरे ता.धरणगाव जि.जळगाव) हिला शेतकरी आत्महत्येचा धनादेश व स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देणगीदाराच्या मदतीने देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, कर्तव्य दक्ष तहसीलदार नितीन कुमार देवरे, नगरसेवक भागवत चौधरी, परीट धोबी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष छोटू जाधव, बाळासाहेब जाधव, रविन्द्र कंखरे, विनोद रोकडे, नवल पाटील उपस्थित होते.