जळगाव प्रतिनिधी । घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्ती प्राप्त करण्याबाबतची योजना दि.14 जुलै, 2021 पासून सुरु करण्यात आलेली आहे.
परंतु बऱ्याच प्रकरणात आधार प्रणालीतील उमेदवाराचा डाटा इतरांशी जुळून येत असेल किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र (नमुना 1 अ) ईसाईनसह अपलोड केलेले नसेल तर अशावेळी उमेदवारास घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्ती करीता ऑनलाईन अर्ज करतांना तपासणी न होणे किंवा उतीर्ण झाल्यानंतर शिकाउ अनुज्ञप्ती क्रमांक जारी न होणे व प्रिंट न निघणे याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत.
अशा प्रकरणात संबंधित उमेदवार या कार्यालयात मुळ आधारकार्डसह समक्ष हजर झाल्यानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षक हे संबंधित उमेदवारांचे आधारकार्डनुसार ओळखीबाबत खातरजमा करुन तपासणी करतील जेणेकरुन अशा उमेदवारांना घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्तीची चाचणी उत्तीर्ण झाल्यास शिकाउ अनुज्ञप्तीची प्रिंट काढता येईल. याबाबत सर्व नागरिकांनी शिकाउ अनुज्ञप्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे