मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी त्यांच्या दोन्ही कन्यांसह संपूर्ण कुटुंब मैदानात उतरले असून ते घरोघरी जाऊन कौल मागत आहेत.
मुक्ताईनगर मतदारसंघात यंदा मोठी चुरशीची लढत होत आहे. यात महायुतीच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले असून त्यांच्या पाठीशी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मित्रपक्षांची ताकद मोठ्या प्रमाणात उभी आहे. याच्याच जोडीला आता पाटील कुटुंब देखील प्रचारात मग्न झाल्याचे दिसून येत आहे. याच्या जोडीला आता संपूर्ण पाटील कुटुंब हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
भल्या पहाटेपासूनच पाटील कुटुंबातील सर्व सदस्य हे प्रचार फेरीसाठी निघत आहेत. यात चंदूभाऊंच्या सौभाग्यवती यामिनी पाटील, चिरंजीव राज, कन्या प्रियंका आणि संजना यांचा समावेश आहे. हे सर्व कुटुंबिय स्वतंत्र प्रचार फेरी काढून आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मतांचा कौल मागत आहेत. गावोगावी प्रत्येक ठिकाणी पाटील कुटुंबाचे अगदी उत्साहात स्वागत होत आहे. तर बऱ्याच ठिकाणी औक्षणासह वार्तालाप देखील होत असल्याचे दिसून येत आहे. चंदूभाऊंनी केलेल्या विकासकामांच्या शिदोरीवर जनता आपल्याला निश्चीत कौल देणार असल्याचा विश्वास ते ठिकठिकाणी व्यक्त करत आहेत.
चंदूभाऊंच्या विजयासाठी कुटुंबीय उतरले मैदानात !
1 month ago
No Comments