नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चंद्रयान 1, पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन झालं आहे. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये काम करत होते.
2008 मध्ये भारताच्या पहिल्यावहिल्या चंद्रयान 1 या इस्त्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत हेडगे यांची भूमिका महत्त्वाची होती. 71 वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी निगडित आजारावर उपचार सुरू होते. त्यामध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.