विधानपरिषद निवडणुकीच चंद्रशेखर बावनकुळे विजयी

नागपूर प्रतिनिधी | राज्याचे माजी उर्जामंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय संपादन केला आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरूध्द कॉंग्रेसने आधी छोटू भोयर यांना उमेदवारी दिली. शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना कॉंग्रेसनं पाठिंबा दिलेला ते पराभूत झाले आहेत

नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना कॉंग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपच्या नियोजनाने त्यांना यश आले आहे.

Protected Content