मतदानपूर्व पाहणीचा कल ममताच्या बाजूने

 

 

 

कोलकाता :  वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  3 आमदार असलेला भाजप प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो.

 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसमधील अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या गोटात सामील होताना दिसत आहेत.  दुसरीकडे ममतादीदींची जादूही कायम असल्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना मतदारांची सहानुभूती मिळताना दिसत आहे. टीएमसीला 43.1 टक्के, भाजपला 38.8 टक्के, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला 11.7 टक्के मतं मिळू शकतात तर इतरांना 6.4 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.

 

ओपिनियन पोलनुसार मुख्यमंत्री पदाची पहिली पसंती ममता बॅनर्जी (51.8) यांना आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मतदारांचा कौल ममता बॅनर्जींना असल्याचं दिसतं. तर भाजपचे दिलीप घोष (24.2), मिथुन चक्रवर्ती (4.6) आणि शुभेंदू अधिकारी (5.2) यांना ममता बॅनर्जी यांच्या तुलनेत कमी पसंती आहे.

 

 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचाच फॅक्टर चालणार असल्याचं पोलमध्ये स्पष्ट झालंय. ममता बॅनर्जी यांचा फॅक्टर चालेल, असं 39.7 टक्के, नरेंद्र मोदी फॅक्टर चालेल असं 28.6 , मुस्लीम फॅक्टर 6.3 , भ्रष्टाचाराचा मुद्दा 14.4 टक्के आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चालेल, असं 6.2 टक्के लोकांना वाटतं.

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्या पायाला दुखापत झाली त्याचा फायदा होत असल्याचं 47 टक्के लोकांना वाटत. तर, त्यांना फायदा होणार नाही असं 41.7 टक्के लोकांना वाटते तर 11.3 टक्के लोकांनी त्यांचं उत्तर दिलं नाही.

 

ओपनियन पोलमध्ये पश्चिम बंगालचा विकास तृणमूल काँग्रेस करेल असा विश्वास 51.1 टक्के लोकांना वाटतं. तर, 38.6 लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. डाव्या पक्षांना 7.5, काँग्रेस 1.1 टक्के, इतर 1.7 टक्के असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतादारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तिथे त्यांच्यासमोर एकेकाळचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. नंदीग्राममध्ये 50 टक्के लोकांची पसंती ममता बॅनर्जी यांना असून 40.7 टक्के शुभेंदू अधिकारी आणि मिनाक्षी मुखर्जी यांना 9.3 टक्के लोकांची पसंती आहे.

Protected Content