शिवसेनेला धक्का : गोपीकिशन बाजारिया पराभूत; भाजपने मारली बाजी

अकोला प्रतिनिधी | अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून देणार्‍या विधानपरिषदेच्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला असून त्यांना भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी धुळ चारली आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या अकोला वाशिम बुलडाणा (Aज्ञेश्रर थरीहळा र्इीश्रवरपर ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात सामना होता. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत.वसंत खंडेलवाल यांना ४३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत. यामुळे येथे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या १८ वर्षापासून इथं भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. ही जागा भाजपने खेचून आणली असून महाविकास आघाडीची फुटलेली मते हा आता चिंतेचा विषय बनल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content