चंद्रशेखर अत्तरदे यांचा सावखेडा येथे प्रचार दौरा उत्साहात

30906a3c 272f 4a6a b48a fea5967281e2

जळगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा सावखेडा गावात आज भव्य प्रचार दौरा मोठ्या उत्साहाने पार पडला.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण केले. एवढेचे नव्हे तर दोघांचा नागरी सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या प्रसंगी गटातील नागरिकांनी दादा आपणच विजयी व्हाल, असे आश्वासन दिले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापती लकी आण्णा उर्फ लक्ष्मण पाटील, संजय भोळे, शिरसोली-चिंचोरी गटातील शक्ति प्रमुख अनिल पाटील, बूथ प्रमुख रोहित पवार तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content