मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघात आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या लागलेल्या निकालात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले असून आ. एकनाथ खडसे यांना मात्र धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यात काल झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीत जोरदार मुसंडी मारून विजयश्री प्राप्त केला असल्याचे आजच्या निकालातून दिसून आले. यात त्यांनी आमदार खडसे यांना मात दिली आहे.
यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंचाचे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून आ.चंद्रकांत पाटील या वेळी म्हणाले की, नवनियुक्त सरपंच व सदस्य यांना अभिनंदन देतो व गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निवडून येणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा असतो कधी कधी पडणारा पण आमचा असतो ग्रामपंचायत काळामध्ये ग्रामपंचायतीच्या ठिकाणी काम करत असताना खर्या अर्थाने कस लागतो आणि ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू जो आहे तो सरपंच आणि ग्रामपंचायत असते त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सगळ्या उपाययोजना करताना मूलभूत गरजा देताना ग्रामपंचायतीसोबत असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकारच्या बाजूने आज मुक्ताईनगर तालुक्यातून जो कौल आलेला आहे तो संमिश्र कौल आहे. सरकारच्या माध्यमातून सगळ्या विकास कामांसाठी सरकार त्याच्या पाठीशी उभा राहील.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली, वढवे, बेलसवाडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवाफडकला आहे. तर रावेर तालुक्यातील खिर्डी-खु, विटवा, आंदलवाडी, कोचुर खुर्द, आणि बोदवड तालुक्यातील गोळेगाव या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच निवडून आलेले असून मतदार संघात आ.चंद्रकांत पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झालेले आहे.
मुक्ताईनगर तालुका सरपंच
बेलसवाडी :- सौ. मंदाताई कोळी
चिखली :- श्री. वैभव पाटील
वढवे:- सौ. संगीता जीवराम कोळी
रावेर तालुका सरपंच
खिर्डी बु :- सौ. चौधरी संगीता भास्कर
वीटवा :- श्री.मुकेश चौधरी
कोचुर खु :- सौ.ज्योती संतोष कोळी
बोदवड तालुका सरपंच
गोळेगाव :- सौ.शारदा समाधान पाटील