मुक्ताईनगर प्रतिनिधी | ‘मुक्ताईनगर’चे आमदार चंद्रकांत पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून या संदर्भात आपल्या सोशल सोशल मीडियाच्या पेजवर त्यानी माहिती दिली.
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असून जळगाव जिल्ह्यातही त्याचे पडसाद पहायला मिळत आहे. कालपासून ४८ तासात जिल्ह्यातील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
‘मुक्ताईनगर’चे आमदार चंद्रकांत पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून या संदर्भात आपल्या सोशल सोशल मीडियाच्या पेजवर त्यानी माहिती दिली. ही माहिती देतांना “मी आणि माझा स्वीय सहाय्यक, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी” यासह ‘नियम पाळा व काळजी घ्या’ असं आवाहन त्यानी केलं आहे.