आव्हाणे शिवारात जुगार अड्ड्यावर धाड; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आव्हाणे शिवारात आज सायंकाळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले आहे. त्याच्या जवळून लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केली आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ६ ते ७ वाजेच्या सुमारास शेतात जावून धडक कारवाई करत छापा टाकला. यात दहा ते बारा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जुगार खेळणाऱ्यांच्या ताब्यातील रोकड, वाहने, मोबाईल असा एकुण लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

Protected Content