जैबून्नीसाबी मुजावर यांचे निधन

एरंडोल प्रतिनिधी । येथील मुजावर वाड्यात राहणाऱ्या एरंडोल नगर पालिकेच्या माजी नगरसेविका जैबून्नीसाबी कादर मुजावर (वय ८७) यांचे वार्धक्याने निधन झाले आहे.

त्या युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस डॉ.बी.के.मुजावर व एरंडोल तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष,पत्रकार,स्टँप वेंडर जावेद मुजावर यांच्या आई होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,जावई,सूना व नातवंडे असा परिवार आहे.

 

Protected Content