चाळीसगावच्या ‘भाग्यश्री’ने टिकटॉकवरील नेटकऱ्यांच्या मनाला घातली भुरळ (व्हिडीओ)

chalisgaon news

चाळीसगाव प्रतिनिधी । एका क्षणात नशीब कसे पालटू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे चाळीसगाव शहरातील भडगांव रोड परीसरातील १७ वर्षीय तरुणी कु.भाग्यश्री दिलीप सूर्यवंशी होय. एका साधारण कुटुंबातील या तरुणीला एका रात्रीतून स्टारडम प्राप्त झाले आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी मैत्रीणींकडून टिकटॉक या ॲपची माहीती झाल्यानंतर व्हिडीओच्या माध्यमातून भाग्यश्री ही रात्रीतून स्टार बनली आहे.

store advt

यात ‘लैला ओ लैला’, ‘श्रीकृष्ण सुभद्राय’, ‘घुंगरु पैंजणात’, ‘जवानी जानेमन’, ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’, ‘बिगडी बनादे’ आदी गाण्यांच्या माध्यमातून खान्देशी कन्या असलेली भाग्यश्री ही रात्रीतून स्टार झाल्याने अनेकांनी तिच्या अकाउंटला जाऊन व्हिडिओ शेअर केले आहे तर या टिकटॉकवरील गाण्यांच्या माध्यमातून भाग्यश्रीने नेटकऱ्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. याची माहीती घेण्यासाठी टिकटॉकवर असंख्य ‘सर्च’ होत आहे. भाग्यश्रीच्या फॉलोअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून जवळपास लाखाच्या घरात ही संख्या पोहोचली आहे.

error: Content is protected !!