ओझर येथे एकाची आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील ओझर येथील तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील ओझर येथील दिलीप सुदाम अहिरे (वय-३४) रा. ओझर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी सायंकाळी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईक गोपीचंद भापलाल अहिरे यांनी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात मयत अवस्थेत दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहाला तपासून मयत घोषित केले. मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी स्वरूपाच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास तुकाराम चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content