मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा — जिल्हाप्रमुख महाजन

वरणगाव प्रतिनिधी ।  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा. गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक मी तयार करणार अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली. ते वरणगाव येथील प्रभाग क्रमांक ७  आणि ८ मध्ये शिव संपर्क अभियान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.  

शनिवार २४ जुलै रोजी शिव संपर्क अभियानप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा कार्यालयीन उप प्रमुख उत्तमराव सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते  सय्यद जाफर अली उर्फ हिप्पी सेट,  तालुका उपप्रमुख सुभाष चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक सईद मुल्लाजी, अब्रार खान यांची उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी पुढे सांगितले की, वरणगाव शिवसेनेला पोषक वातावरण आहे,  शिवसेनेमध्ये तरूणांचा प्रवेश वाढत आहे.  मुस्लिम समाजाने साथ दिल्यास येत्या निवडणुकीमध्ये वरणगाव नगरपालिकेवर ती भगवा फडकला शिवाय राहणार नाही, त्याला कारण असे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य आपण सर्व महाराष्ट्र बघत असल्याचेही महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  ना. गुलाबराव पाटील यांची साथ तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घोडदौड भुसावळ तालुक्यात सुरू आहे. त्याचबरोबर वरणगाव शहरात आपणा सर्वांच्या सहकार्याने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने भगवा फडकवण शक्य आहे.  प्रा. उत्तमराव सुरवाडे  यांनी देखील  शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद वर्णभेद पंथभेद मानला जात नाही. इथे फक्त एकच शिवसैनिक हीच आपली जात धर्म कोणत्याही समाजाचा माणूस शिवसेनेमध्ये मोठ्या पदावर जाऊ शकतो.  शिवसेनेमध्ये काम करण्याची चिकाटी तरुणांनी धरायला पाहिजे. येणाऱ्या काळात वरणगाव नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे कामे करा असेही प्रा. सुरवाडे यांनी सांगितले. सईद मुल्ला, सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, अब्रार खान यांनी देखील मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रम प्रसंगी प्रभाग क्रमांक ७  आणि ८  मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.

Protected Content