Chalisgaon चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षातून पुन्हा एकदा याच पदावर वापसी झाली असून कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
चाळीसगाव येथील पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांना ७ जुलै रोजी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून पाठविण्यात आले होते. पाटील यांनी अतिशय धडाकेबाज कामगिरी करत अवैध धंद्यांना चाप बसविल्याने ते येथून गेल्यामुळे दोन नंबरच्या धंदेवाल्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र पंधरा दिवसात ते पुन्हा एकदा चाळीसगाव पोलीस स्थानकाला पुन्हा रूजू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान. पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांचे शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी स्वागत केले. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा एकदा सांभाळला आहे.