चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हिरापूर रोडवर सुरू असणार्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी रोकड जप्त करत तिघांवर कारवाई केली आहे.
याबाबत वृत्त असे की, हिरापूर रोडवरील भिलाटी भागात नाल्याच्या किनारी भागात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. लागलीच त्यांच्या निर्देशानुसार पोहेकॉ/२५२३ अभिमन पाटील, पोकॉ/ १०३२ संदिप पाटील, पोकॉ/२२३३ निलेश पाटील, पोकॉ/१४१९ विजय पाटील व पोकॉ/९९४ विनोद खैरनार आदींनी १९ रोजी ४ वाजताच्या सुमारास वरील ठिकाणी छापा टाकला असता. अंगझडतीतून एकूण १७९० रूपये रोकड मिळून आली.
दरम्यान या प्रकरणी शेखर उर्फ गंगा मल्लाआप्पा गवळी वय-२८, अविनाश गोविंद गवळी वय-३२ व जालिंदर नेमाजी गवळी सर्व रा. हिरापूर रोड नवीन नाका या आरोपींचे नाव आहे. याबाबत पोट/१४२२ शरद मांगो पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट भादवी कलम १२ (अ) नुसार फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलिस कर्मचारी मुकेश पाटील हे करीत आहेत.