भाड्याने दिलेल्या गाडीच्या पैशांवरून तरूणावर ब्लेडने वार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सामरोद येथे चार चाकी वाहनाचे भाड्याचे पैसे देण्याच्या कारणावरून एका तरुणाला ब्लेडने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील सामरोद येथे अतुल कैलास मेढे (वय-२८) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याच्या काकांनी भाड्याने केलेल्या गाडीचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये अविनाश कैलास जोहरे रा. हिवरखेडा ता. जामनेर याने अतुल मेढे याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या अंगावर हातातील ब्लेडने वार करून गंभीर दुखापत केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अतुल मेढे याला तातडीने जामनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अतुल मेढे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी अविनाश कैलास जोहरे रा. हिवरखेडा ता. जामनेर यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज शेख करीत आहे.

Protected Content