हुतात्मा यश देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

शेअर करा !

चाळीसगाव प्रतिनिधी । काल श्रीनगर येथील दहशतवादी हल्ल्यात वीरगतीस प्राप्त झालेले पिंपळगाव येथील जवान यश डिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

काल श्रीनगर येथे लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथे पोहचले आहे.
लष्कराची गार्ड टीम ऊद्या सकाळी ६ वा. त्यांचे पार्थिव घेऊन नाशिक येथून निघणार असून सकाळी ८. ३० वाजता पिंपळगाव येथे पोहोचणार आहे.

त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ येथील कर्नल करूण ओहरी यांनी दिली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!