भेट नाकारल्याचा कांगावा हा तर भाजपचा स्टंटच (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । आज भाजपा महिला आघाडीतर्फे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनी भेट नाकारल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला या आरोपाला उत्तर देतांना ठाकूर यांनी हा त्याचा स्टंट असल्याचा टोला लगाविला . त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

याप्रसंगी पक्ष निरीक्षक प्रकाश मुगदिया, माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस आ. शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी. जी.भाऊसाहेब आदी उपस्थित होते.

संविधान न मानणाऱ्याचा आंतरजातीय विवाहास विरोध
भाजपतर्फे लव्ह जिहादचा कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी करण्यात येत आहे याबाबत मंत्री यशोमती ठाकूर यांना विचारले असता त्यांनी १९५४ मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा पास झाला असून जे लोक संविधान मानत नाहीत तेच लोक याला विरोध करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

‘त्यांनी’ महापालिका हद्दीतील खड्डे बुजवावेत
भाजपा महिला आघाडीतर्फे निर्दशने करण्यात आली त्याबाबत मंत्री यशोमती ठाकूर यांनी हा केवळ राजकीय स्टंट असल्याचा टोला लगावत मी सगळ्यांना भेटले, त्यांना भेटायचे होते तर भेटायला पाहिजे होते यात महापौर व इतर लोक होते. त्यांनी शहरात एवढे खड्डे करून ठेवले आहे त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहराचा विकास करण्याचे आश्वसन दिले होते, त्याचा समाचार घेत माजी पालकमंत्री यांनी जळगाव दत्तक घेऊन दुबई सारखे करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र मला तसे काही दिसले नाही असा टोला लगावित महापालिका हद्दीत खड्डे पडले आहेत ते त्यांनी बुजवावेत असा सल्ला ठाकूर यांनी आ. गिरीश महाजन यांचे नाव न घेता दिला.

महिलांच्या सुरक्षतेसाठी ‘शक्ती कायदा’
राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात येत आहे, यावर राज्य सरकार महिलांच्या सुरक्षतेसाठी पुढाकार घेत असून महिलांच्या सुरक्षीतेसाठी शक्ती कायदा आणला जात आहे, याचे प्राथमिक वाचन होत असून जेव्हा अधिवेशन होईल तेव्हा तो कायदा येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपला त्यांना सांभाळता आले नाही
मुख्यमंत्री नेहमी आडवे करू उभे पाडू अशी भाषा वापरत असतात त्याबद्दल आपली भूमिका काय ? असे विचारले असता मंत्री ठाकूर यांनी
आताचे मुख्यमंत्री हे व्यापक विचारधारेचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, भाजपला त्यांना सांभाळता आले नाही याचा अर्थ असा नाही ते तसे आहेत. कुटुंब प्रमुख म्हणून ते महाविकास आघाडी खरोखर व्यवस्थित सांभाळत आहेत अशी पुष्टी जोडत, कोविडच्या काळात मध्य प्रदेशातील सरकार तोडण्यात आले फोडण्यात आले, राजस्थान मध्ये तसा प्रयत्न करण्यात आला असा आरोप केला. भाजपने चार वर्ष सक्षम विरोधीपक्ष म्हणून भूमिका निभावावी अशी भूमिका त्यांनी मांडली.

वीज बिलाबाबत महाराष्ट्र हिताचाच निर्णय
कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या मंत्र्यांना निधी देत नसल्याचा आरोप केला होता, याबाबत आपण ऐकलेले नसल्याचे सांगत तीन पक्षांचे सरकार असल्याने कुटुंबात वाद-विवाद होतच असतात अशी बाजू घेत, आघाडी असल्यावर हमरीतुमरी चालूच राहील यात ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत त्याबाबत आम्ही काम करीत असतो. वीज बिलबाबत आंदोलन होत आहे,
मागील काळात त्यांनी गोष्टी थकीत ठेवल्या आहेत. महाराष्ट्राला पूर्ण रिकामे करून ही मंडळी निघून गेली आहे, वीज बिलाबाबत महाराष्ट्राच्या हिताचाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वसन देत जे वीज बिल जाळतात ते संविधान देखील जाळतात अशी टीका नाव न घेता केली. केंद्र सरकारने महाराष्ट्राला पोरके करण्याचे ठरविले असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत केंद्राला वारंवार पत्रे लिहिली आहेत, त्यावर ते काही करत नाही महाराष्ट्रात जनावरे राहतात का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला. राज ठाकरे यांनी लाईट बिले भरू नका असे आवाहन करतात ही त्यांची विध्वंसक वृत्ती असल्याची टीका त्यांनी केली.

एकनाथराव खडसे यांचा महाविकास आघाडीला फायदाच
विरोधी पक्षात असतांना ते तेव्हाच्या त्यांच्या पक्षाचे संरक्षण करायचे ते आम्ही पहिले आहे, अशा एका कार्यकर्त्याची किमत तो पक्ष करू शकला नाही, महाविकास आघाडीत त्यांचे स्वागत आहे, महाविकास आघाडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली.

राज्यात विविध ठिकाणी इडीची कारवाई करण्यात येत असली तरी इडीच्या प्रयोगांना आम्ही घाबरत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Protected Content