चाळीसगावात मराठा समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन ( व्हिडीओ )

चाळीसगाव प्रतिनिधी । मराठा समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी येथे आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. मराठा समाज समन्वय समितीचे सदस्य लक्ष्मणबापू शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयांमध्ये वकिलांना सुनावणी मध्ये सामील करून घ्यावे. मराठा आरक्षण व मराठा समाजाचे महत्वाचे विषय ना. विजय वडेट्टीवार यांच्या कडे न ठेवता दुसर्‍या जाणकार मंत्री महोदयांकडे द्यावेत. सारथी संस्थेस भरघोस निधी उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावी, मराठा आरक्षण २०१४/२०१५ मध्ये एसईबीसी मधून नोकरीसाठी मुलाखत दिली, पण अशा सर्वांना शासनाने रुजू करून घेतले नाही त्या सर्व मराठा विद्यार्थ्याना त्वरित न्याय द्यावा व नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी चाळीसगाव येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

मराठा समन्वय समितीचे समन्वयक लक्ष्मण शिरसाठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नियोजित चौकात दुपारी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर सोशल डिस्टन्स राखून हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी लक्ष्मणबापू शिरसाठ यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. आज हे आंदोलन राज्यभरात करण्यात येणार असून महाविकास आघाडी सरकारने याची दखल न घेतल्यास हा लढा तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खालील व्हिडीओत पहा जागरण गोंधळ आंदोलनाची चलचित्रे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/733753757411691/?eid=ARBrvQCNdrliITvxiGGdRrewFTfaZhz4WlBfOjAvhhRvUpJsvNxD_q3mTHoV3ExPZJDRnArYG37JkbMB

Protected Content