चाळीसगाव प्रतिनिधी । जगतिक आदिवाशी गौरव दिन व क्रांती दिनानिमित्त वलठाण गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते दफ्तर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्जल व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. आश्रमशाळेतील आदिवाशी विद्यार्थ्याना दफ्तर दिल्याने आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाने युवा नेते मंगेश चव्हाण यांचे आभार मानले. गोर गरीब विद्यार्थ्याच्या पाठीवर दफ्तराचे ओझे दिसल्यास खरी क्रांती होईल, असे मत क्रांती दिनानिमित्त घेतलेल्या या कार्यक्रमात बोलताना युवा नेते मंगेश चव्हाण यांनी मांडले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच संजय राठोड, मार्केट कमेटी संचालक मच्छिन्द्र राठोड, तंटा मुक्तीचे अध्यक्ष संदीप राठोड, सुभाष राठोड, ग्रामपंचायत सदस्य समाधान राठोड, ग्रामपंचायत सदस्य सुभाष राठोड, वाल्मीक राठोड, पंडित राठोड, उमेश आव्हाड, मुख्याद्यापक आर. एस. चौधरी, रोहिनीचे सरपंच अनिल नागरे, सुनील निकम, मनोज गोसावी, अखलाक शेख व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.