मनोरंजन झाले असेल तर प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी व्हा- ना. महाजन ( व्हिडीओ )


मुंबई प्रतिनिधी । मदतकार्याचे राजकारण करणार्‍या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मनोरंजन पूर्ण झाले असेल तर प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी व्हावे असा टोला लगावत ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी उत्तर दिले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणार्‍या बोटीवरील सेल्फी व्हिडीओत आनंदी मुद्रेतील जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना पाहून राज्यभरातून तीव्र टीका करण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यावर जोरदार चर्वण होत आहे. तर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ना. गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, ना. गिरीश महाजन यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ दिला असून यात ते स्वत: खोल पाण्यातून पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी विरोधी पक्षांना टोला लगावला आहे.

या ना. गिरीश महाजन म्हणतात की, ”गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो. मदतकार्याचे राजकारण करणार्‍या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे !” या माध्यमातून त्यांनी आपल्यावर होणार्‍या टिकेला उत्तर दिले आहे.

Protected Content