चाळीसगाव नगरपालिकेत असतील ३६ नगरसेवक; अशा असतील प्रभागाच्या सीमा

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  चाळीसगाव नगरपालिकेची प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. यात १८ प्रभाग असून ३६ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. चाळीसगाव प्रभाग संदर्भात  हरकती घेण्यासाठी १७ मार्च रोजी अखेरची मुदत असल्याची माहिती चाळीसगाव मुख्याधिकारी यांनी दिली.

 

प्रभाग क्रमांक १ – वॉर्डातील लोकसंख्या ५ हजार २६३ 

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर – धुळे रोड नगरपालिका हद्दीपासून धुळे रेल्वे बोगदापर्यंत,

पूर्व – धुळे रेल्वे बोगद्यापासून रेल्वे ट्रॅक उड्डाणपुलाखाली मोरीतून रोडणे रेल्वे पादचारी पुलावरून रेल्वे पाणी टाकीपर्यंत

दक्षिण – रेल्वे पाणी टाकीवरून शाळा क्रमांक २ समोरून आनंदवाडी झोपडपट्टीने पीएसआय जाधव यांच्या घरापासून निखिल डेअरीवरून वाय पॉइंटपर्यंत

पश्चिम – बाय पॉइंट वरून धुळे रोडणे मानराज मोटर्स वरून नगरपालिका हद्दीपर्यंत

 

प्रभाग क्रमांक २ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ९१६

प्रभागाच्या सीमा –

उत्तर – भुसावळ रेल्वे ट्रॅकवरील चाळीसगाव हद्दीपासून टाकळी-चाळीसगाव हद्दीने भडगाव रोडपर्यंत

पूर्व – भडगाव रोडवरील नगरपालिका हद्दीपासून भडगाव रोड ते कॅप्टन कॉर्नरपर्यंत

दक्षिण – कॅप्टन कॉर्नरपासून करगावरोड ने बालाजी हॉस्पिटलवरून डॉ. करंबेळकर यांच्या शल्यशोभा हॉस्पिटलवरून धुळे बोगद्यापर्यंत

पश्चिम – धुळे रेल्वे बोगदा पासून रेल्वे ट्रेकने टाकळी चाळीसगाव हद्दीपर्यंत

 

 

प्रभाग क्रमांक ३ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ६६८

प्रभागाच्या सीमा –

उत्तर – खरजई नाक्यापासून नगरपालिका हद्दीने सचिन निकुंभ यांच्या घरापर्यंत पूर्व सचिन निकुंभ यांच्या घरापासून तितुर नदीपात्राने गणपत चौधरी यांच्या घरावरून अमरधाम स्मशानभूमीपर्यंत

दक्षिण – अमरधाम स्मशानभूमीवरून ताराबाई कदम यांच्या घरावरून नवजीवन व्यायाम शाळे समोरुन धर्मा मिस्त्री यांच्या घरावरून रस्ता ओलांडून कापसे भाऊसाहेब पाटील यांच्या घरावरून मिल कंपाऊंडला धरून मिलरोडपर्यंत तेथून मिल कंपाऊंड भगवती डेव्हलपर्स वरून स्नेह श्रीराम अपार्टमेंटवरून राजू वाणी यांच्या घरापर्यंत तेथुन रस्ता ओलांडून वि.रा. जाधव यांच्या घरावरून हॉटेल अमोलपर्यंत आणि पश्चिम घाट ते हॉटेल अमोलपासून भडगाव रोडणे रमाबाई आंबेडकर नगरवरुन खरजई नाक्यापर्यंत

 

प्रभाग क्रमांक ४ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार १९९ 

प्रभागाची सीमा – 

उत्तर – तितुर नदीपात्र वरील नगरपालिका हद्दीपासून नगरपालिका हद्दीने स. नं.  15 16 व 17 पर्यंत पूर्व नगरपालिका हद्दीपासून उर्दू बालवाडी ते गरीब नवाज चौक ते नाला तेथून नाला ओलांडून लक्ष्मण कृपा शांताई घर ते सुभाष हरचंद्र चौधरी ते जगनाडे चौक ते संताजी पॉइंट ते घाट रोड वरील हॉटेल सदानंद

दक्षिण – घाट रोडवरील हॉटेल सदानंद पासून घाट रोडने घाट रोड पुलापर्यंत

पश्चिम – भागातून घाट रोडवरील पुलावरून तितुर नदी पात्राने थेट नगरपालिका हद्दीपर्यंत

 

प्रभाग क्रमांक ५ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ५७२

प्रभागाच्या सीमा –

उत्तर – राष्ट्रीय विद्यालय बोर्डिंग मागून भोसले आबा यांच्या घरापर्यंत, भोसले आबा यांच्या घरापासून डॉक्टर माळी येथे भावसार यांच्या घरावरून स्नेहा पुष्प बिल्डिंगपर्यंत तेथून इंदिरानगर झोपडपट्टी वरून के. डी. पाटील यांच्या घरापर्यंत, के.डी. पाटील यांच्या घरावरून मिल कंपाऊंड पवार सर यांचे घरापर्यंत तेथुन राणे युवराज चौधरी यांच्या घरावरून पारस परदेशी यांच्या घरापर्यंत तेथुन अमरधाम स्मशानभूमी पर्यंत

पूर्व – अमरधाम स्मशानभूमीवरून हॉटेल दयानंदपर्यंत तेथून मुथूट फायनान्स, अॅक्सिस बँक पर्यंत तेथून नदी किनाऱ्याने सूर्यनारायण मंदिरावरून बाजार पुलापर्यंत शिवाजी घाट

दक्षिण – बाजार पुलावरून शिवाजी घाट हॉटेल शीतलपर्यंत, हॉटेल शीतल पासून अल्पोपहार हॉटेल शितलपर्यंत तेथुन रस्ता ओलांडून तहसील कार्यालयापर्यंत तेथून स्टेशनरोड साजन सिलेक्शन ते हॉटेल सदानंद पॅलेसपर्यंत आणि पश्चिम भाग हॉटेल सदानंद पॅलेसपासून भडगाव रोडने स्टेट बँक वरून राष्ट्रीय विद्यालय बोर्डिंगपर्यंत

 

वार्ड क्रमांक ६ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ७१९

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर – करगाव नाक्यापासून घाडगे नाना यांच्या घरावरून डॉ. देवरे हॉस्पिटलवरून कारगाव रोडने कॅप्टन कॉर्नरपर्यंत

पूर्व – भडगावरोड वरील कॅप्टन कॉर्नरपासून भडगाव रोडने कन्हैयालाल बजाज कॉम्प्लेक्स पर्यंत

दक्षिण – भाग कन्हैयालाल बजाज कॉम्प्लेक्सवरून धुळे रोडने उड्डाणपुलावरील लक्ष्मी मंदिर, रेल्वे ट्रॅकपर्यंत

पश्चिम – लक्ष्मी मंदिरापासून रेल्वे ट्रॅक ने देवकर माडावरून करगाव नाक्यापर्यंत

 

प्रभाग क्रमांक ७ – वार्डातील लोकसंख्या ४ हजार ९६७

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर –  सिंधी समाज मंगल कार्यालयपासून उड्डाणपुलाखालील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत तेथुन रस्ता ओलांडून स्टेशन रोडने राष्ट्रीय कन्या शाळा तेथून हॉटेल मंगलम राजापर्यंत

पुर्व – हॉटेल मंगलम प्लाझापासून देशी दारू दुकानापासून नदी पुलावरून नदी पात्राने तिरंगा पुलापर्यंत

दक्षिण – तिरंगा फुलापासून हिरापूर रोड ते नवजीवन वॉलवरून विजय कापड दुकान यांच्या घरापर्यंत तेथुन गुरुकुल विद्यालय ते कलंत्री यांच्या घरापर्यंत तेथुन अध्यापक विद्यालय तेथुन रस्ता ओलांडून लॉज हॉटेल त्यातून महावीर हॉस्पिटल वरून मशिदी पर्यंत

पश्चिम – मशिदीपासून हॉटेल एम के वाईन शॉप वरून स्टेशन रोड पॉलिसी यांचे पानपोई पर्यंत तेथून थेट रेल्वे लाईन ते सिद्धी मंगल कार्यालयापर्यंत

 

प्रभाग क्रमांक ८ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ६३६ 

प्रभागाची व्याप्ती व सीमा

उत्तर – एक वेळा किराणा दुकान (विलास बोरणारे ) पासून सुनील पाटील यांच्या घरावरून एस.एस. देसले यांच्या घरावरून जुन्या मालेगावरोड वरील चैतन्यश्वर महादेव मंदिरवरून निखिल डेअरी वरून मिठूलाल हरलाल पवार यांच्या घरापर्यंत,

पूर्व – मिठूलाल हरलाल पवार यांच्या घरापासून आनंदवाडी झोपडपट्टीच्या मागे बाजूने शाळा नंबर २ वरून केकी मूस यांच्या कलादालनात पर्यंत तेथून रेल्वे जिल्ह्यापर्यंत

दक्षिण – रेल्वे जिल्ह्यापासून रेल्वे पाण्याची टाकी वरून रेल्वे ट्रॅकने महात्मा फुले नगरवरुन नवलेवाडीपर्यंत तेथून नंदू राजपूत यांच्या जुन्या घरावरून डीपी रोडने चव्हाण यांच्या घराजवळील मोकळ्या जागेने गुरु पुष्प प्रोव्हिजन स्टोअर्स वरून मंगेश पाटील यांच्या घरा समोरील रस्त्याने मालेगाव नाक्यापर्यंत

पश्चिम – मालेगाव नाक्यापासून वाय पॉईंटच्या दिशेने मालेगाव रोडवरील नगरपालिका उद्यापर्यंत

 

प्रभाग क्रमांक ९ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार २७१

प्रभागाच्या सीमा  –

उत्तर – धुळे रोड नगरपालिका हद्दीपासून धुळे रोडने धुळे नाका ते पॉलिसी पेट्रोल पंप ते वाय पॉईंट वरील हॉटेल अष्टविनायकपर्यंत,

पूर्व – हॉटेल अष्टविनायक वरून जय हिंद विद्यालयावरून अविनाश चौधरी यांच्या घरावरून कपिल पाटील यांच्या घरावरून देवराम पाटील यांच्या घरावरून मालेगाव रोडवरील नगरपालिका उद्यानापर्यंत तेथून मालेगाव रोडने मालेगाव नाक्यापर्यंत

दक्षिण – हॉटेल अशिषवरून मंगेश पाटील यांच्या घरावरून गुरु पुष्प प्रोव्हिजन स्टोअर्स तेथून चव्हाण यांच्या घरा जवळील मोकळ्या जागेने डीपी रोडणे देशमुख यांच्या चक्की वरून रेल्वे ट्रॅकपर्यंत तेथून मनमाड रेल्वे ट्रॅकने नगरपालिका हद्दीतीलपर्यंत आणि पश्चिम गेम मनमाड रेल्वे ट्रकने नगरपालिका हद्दीपासून मालेगाव रोड नगरपालिका हद्दीपर्यंत तेथून धुळे रोड नगरपालिका हद्दीपर्यंत

 

प्रभाग क्रमांक १० – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ६५८

प्रभागाच्या सीमा 

उत्तर – अशोक स्तंभपासून गुरुदत्त प्रवचन वरून डीपी रोडने तालुका कृषी अधिकारी कार्यालयवरून हिरापूर रोडपर्यंत तेथुन रस्ता ओलांडून हिरापूर रोडने पेट्रोल पंपावरून तिरंगा पुलापर्यंत

पूर्व – तिरंगा फुलापासून तितुर नदी पात्राने नगरपालिका हद्दीपर्यंत

दक्षिण – तितुर नदीवरील नगरपालिका हद्दीपासून हिरापुर रोड नगरपालिका हद्दीपर्यंत तेथून चाळीसगाव खडकी हद्दीने रेल्वे ट्रॅकपर्यंत

पश्चिम बाजू मनमाड रेल्वे ट्रॅकवरील नगरपालिका हद्दीपासून रेल्वे लाईन भिंतीला लागून असलेले अशोक स्तंभापर्यंत

 

प्रभाग क्रमांक ११ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ४५३

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर – माताजी स्टोअर्स वरून पोलीस चौकीपर्यंत तेथून डॉ. तलरेजा यांच्या घरावरून मशिदीपर्यंत तेथून मे.ज. नातू यांच्या घरावरून मुंदडा हॉस्पिटलवरून नालंदा विद्यालय रस्ता ओलांडून ॲड. गजानन पूर्णपात्रे वरून मुख्याधिकारी निवासस्थान ते हिरापूर रोडवरील सागर ममता डेअरीपर्यंत पूर्व हिरापुर रोडवरील सागर ममता डेअरीपासून हिरापुर रोडने तालुका कृषी अधिकारी कार्यालयापर्यंत

दक्षिण – तालुका कृषी अधिकारी कार्यालयापासून त्यांच्या मागील बाजूने डी.पी. रोडने वरदविनायक मंदिरावरून अशोक स्तंभापर्यंत

पश्चिम – खानदेश ऑइल मिल ते रेल्वे कॉटर्स पर्यंत तेथून अनिल नगर वरून माताजी स्टोअर्सपर्यंत

 

वार्ड क्रमांक १२ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ३३० 

प्रभागाच्या सीमा –

उत्तर – घाट रोडवरील राधास्वामी मार्केट पासून श्री पद्म प्रभू स्वामी जैन मंदिरावरून स्टेशन रोडने नंदन डेअरी ते शिवाजी घाट पुलावरून जुन्या नगरपरिषद कार्यालयापर्यंत

पूर्व – जुन्या नगरपालिका कार्यालयावरून माधव इलेक्ट्रिक यांच्या दुकानावरून पंडित मोतीराम सराफ यांच्या दुकानावरून हत्ती बिल्डिंगपर्यंत तेथून सुर्वे यांच्या घरापासून शहरीमधून भगतसिंग राजपूत यांच्या घरावरून रिंगरोडने पीर मुसा कादरी दर्गावरून रोशन नगर झोपडपट्टीपर्यंत

दक्षिण – रोशन नगर झोपडपट्टी येथून नगरपालिका स्वच्छता वरून डोंगरी नदी पत्राने मस्तानी अम्मा पुलापर्यंत तेथून तितूर नदी पात्राने काडी कारखाना पुलापर्यंत आणि पश्चिम काडी कारखाना फुलापासून राधास्वामी मार्केट पर्यंत

 

 

प्रभाग क्रमांक १३ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ५२७

प्रभागाच्या सीमा –

उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मटने मार्केट पर्यंत घाट रोडवरील नगरपालिका स्वच्छातालयपर्यंत

पूर्व – घाट रोड नगरपालिका स्वच्छतालयापासून घाट रोडने,  घाट रोड पोलीस चौकीपर्यंत घाट रोड पोलीस चौकीपासून अंतर्गत रस्त्याने पाटणादेवी रोडवरील जय मल्हार जनरल स्टोअर्सपर्यंत

दक्षिण – पाटणादेवी रोड वरील जय मल्हार जनरल स्टोअर पासून रांजणगाव दरवाजा महादेव मंदिरावरून रिंग रोडने भगतसिंग राजपूत यांचे घरावरुन नथमल मुलचंद यांचे कापड दुकानापर्यंत

पश्चिम – नथमल यांच्या कापड दुकानावरून थेट रामबाण मेडिकल येथून थेट बहाड दरवाजा नाना टी हाऊस वरून नदी पात्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत

 

 

प्रभाग क्रमांक १४ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ७४० 

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर – संताजी पान स्टॉलपासून संताजी पॉइंट वरून जगनाडे चौक ते वैजयंती बाई चौधरी भिकन बंडू चौधरी यांच्या घरावरून राजेंद्र गोविंदा धामणे यांच्या दुकानापर्यंत तेथून नाल्यापर्यंत तेथून नाल्याचे गरीब नवाज चौकापर्यंत तेथून उर्दू बालवाडी पर्यंत

पूर्व – दिशेने थेट नगरपालिका हद्दीपर्यंत पूर्व नगरपालिका हद्दीपासून असलम शेख नयारा यांच्या घरापासून हस्मुद्दिन हस्मुद्दिन यांच्या घरावरून मदिना मशिद रोडणे मदिना मशिदपर्यंत तेथून नगरपालिका मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून नगरपालिका महिला स्वच्छतालयापर्यंत दक्षिण नाल्या शेजारील नगरपालिका महिला स्वच्छतालयापासून अख्तर डॉक्टर यांच्या घरा समोरील रस्त्याने यशवंत मेडिकल वरून घाटरोडवरील साईबाबा मंदिरापर्यंत आणि पश्चिम घाट रोडवरील साईबाबा मंदिरावरून घाटरोड नाही संताची पान स्टॉल पर्यंत.

 

 

प्रभाग क्रमांक १५ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ६३१ 

प्रभागाच्या सीमा –

उत्तर -नगरपालिका महिला स्वच्छतालया शेजारील मोकळ्या जागेतून नगरपालिका मंगल कार्यालयपर्यंत तेथून रस्त्याने मदिना मशीदपर्यंत तेथून मदिना मशिद रोड  नूरुद्दीन पैलवान यांच्या घरापर्यंत तेथुन मित्तल नगर तेथून पूर्वेला नगरपालिका हद्दीपर्यंत

पूर्व – नगरपालिका हद्दी नागद रोडवरील नगरपालिका हद्दीपर्यंत

दक्षिण – नागद रोडवरील नगरपालिका हद्दीपासून नागद रोडवरील समर्थ प्रोव्हिजन सुंदर भवनपर्यंत तेथून अंतर्गत रस्त्याने गरीब नवाज मंडप समोरील मोकळ्या जागेपर्यंत तेथून संजय देशमुख, अजय देशमुख यांच्या बंद घरावरून मोकळ्या जागेतून नागद रोड पर्यंत तेथून नागा जोडणे आठवडे बाजार पर्यंत

पश्चिम – आठवडे बाजारापासून कृष्णा डेरी पर्यंत तेथून महादेव मंदिरा मागील विद्युत डीपी पर्यंत तेथून आला शेजारील रस्ताने नगरपालिका महिला सूचना पर्यंत

 

 

प्रभाग क्रमांक १६ – वार्डातील  लोकसंख्या ४ हजार ९७७

प्रभागाच्या सीमा –

उत्तर – घाट रोडवरील उत्तमचंद हिराचंद यांचे दुकान ऑइल मिल शेजारच्या रस्ताने पाकीजा बँगल्स दुकानावरून नारळ शेजारील फिरोज खान यांच्या घरापर्यंत

पूर्व – नाल्या शेजारील फिरोज खान यांच्या घरापासून नाल्या शेजारील रस्त्याचे महादेव मंदिरा मागील विद्युत डीपीपर्यंत तेथून कृष्णा डेअरी शेजारील आठवडे बाजार रस्त्यावरून नागद रोडपर्यंत

दक्षिण – नगर रोडवरील आठवडे बाजारापासून रस्ता ओलांडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंती शेजारील सिमेंट रोडपर्यंत तेथून झोपडपट्टीतील सिमेंट रोडने घाट रोडवरील बापू कांबळे बांबूवाले निखिल मेन्स पार्लर पर्यंत तेथून नागद चौफुली पर्यंत

पश्चिम – नागद चौफुली भरून घाट रोडणे घाट रोडवरील ऑइल मिल उत्तमचंद हिराचंद यांच्या दुकानापर्यंत

 

 

प्रभाग क्रमांक १७ – वार्डातील लोकसंख्या ५ हजार ३११ 

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर – नागद चौफुली पासून घाट रोडने बापू कांबळे बांबूवाले पर्यंत तेथून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुंपणाच्या भिंतीने नागद रोडपर्यंत तेथून नागद रोड नॅशनल वेल्डिंग वर्कशॉप अपना सॉ मिल पर्यंत तेथून पाठीमागे आशा सूर्यवंशी यांच्या घरापासून गरीब नवाज मंडपपर्यंत येथून अंतर्गत रस्त्याने नागाच रोडवरील समर्थ प्रोव्हिजन पर्यंत तेथून नागद रोडने चाळीसगाव नगरपालिका हद्दीपर्यंत

पूर्व – नागद रोड नगरपालिका हद्दीपासून हॉटेल डायमंड पर्यंत

दक्षिण – हॉटेल डायमंडपासून पाटणादेवी रोडवरील नगरपालिका हद्दीपर्यंत

पश्चिम – पाटणादेवी रोड वरील नगरपालिका हद्दीपासून पाटणादेवी रोडने नगरपालिका स्वच्छातालयपर्यंत तेथून रोशन नगर झोपडपट्टी व रोशन बाबा दर्गाच्या सेनेने पाटणादेवी रोड वरील भगवान शिंदे यांच्या घरावरून घाट रोड पोलिस चौकी पर्यंत तेथुन रस्ता ओलांडून नागा चौफुली पर्यंत

 

प्रभाग क्रमांक १८ – वार्डातील लोकसंख्या ४ हजार ९१३ 

प्रभागाच्या सीमा – 

उत्तर – तिरंगा फुलापासून तितुर नदी पात्राने चामुंडा देवी मंदिराजवळील पुलापर्यंत

पूर्व – चामुंडा देवी मंदिराजवळील पुलापासून डोंगरी नदी पात्राने पीर मुसा कादरी दर्गाच्या पाठीमागील बाजूने दर्गा परिसर अवघडून नदी पत्राने कोदगाव पुलापर्यंत

दक्षिण – कोदगाव फुलापासून पाटणादेवी रोड नाही नगरपालिका हद्दीपर्यंत तेथून नगरपालिका दिने डोंगरी नदीपात्र पर्यंत तेथून नगरपालिका हद्दीने तितुर नदीपात्र पर्यंत आणि पश्चिम तितुर नदी पात्राने तिरंगा पुलापर्यंत

 

 

 

Protected Content