चाळीसगावातील न.पा. कर्मचार्‍यांचा संपात सहभाग; जोरदार घोषणाबाजीने निषेध

चाळीसगाव प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी राज्यातील नगरपालिका कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन केले असून यात येथील नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आहे.

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात काम करणार्‍या विविध कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यात चाळीसगाव नगरपरिषदेसह संपूर्ण राज्यभरात हा संप पुकारला गेला. यात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना, व संघर्ष समितीचे सदस्य सहभागी झाले आहेत.

चाळीसगाव नगरपरिषद कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून निघाला. नगरपरिषद कर्मचारी यांच्या वर्षानुवर्षेच्या मागण्या प्रलंबित असून राज्य सरकार याबाबत कोणतीही दखल घेत नाही, तसेच मागणीबाबत गांर्भीय दाखवत नाही. नगरपरिषद कर्मचारी हा अत्यावश्यक सेवेतुन जनतेचे समाधान करत असतो यात आपत्ती, महापुर, साथीचे रोग, आगीचे तांडव वा सद्यस्थितीतील कोवीड १९ सारखा विषाणूजन्य आजार असो या ठिकाणी नगरपरिषद कर्मचारी स्व:तची पर्वा न करता उभा राहतो. मात्र शासन याकडे लक्ष देत नाही.

ज्या ज्या वेळी नगरपरिषद कर्मचार्‍यांवर अशा पद्धतीची परिस्थीती उदभवते त्यावेळी शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते. तरी आजच्या आंदोलनातील उल्लेख केलेल्या मागणीचा विचार होऊन पुर्ण करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी यावेळी आंदोलनात सहभागी सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

या आंदोलन राज्य संघटना सदस्य तथा जिल्हाध्यक्ष दिनेश जाधव, रोजंदारी कर्मचारी कृती समिती सहसचिव प्रेमसिंग राजपूत, लिपिक भूषण लाटे, महेश शिंदे, कुणाल महाले, राहुल साळुंखे, विलास नेरपगार, संजय राजपूत, वसंत देशमुख, प्रवीण तोमर, जितेंद्र जाधव, नितीन सुर्यवंशी, सुमित सोनवणे, अरुण देशमुख, प्रसाद बाविस्कर, बापू कोळी, नामदेव तुपे, रुपेश देशमुख, पृथ्वीराज ठोके, कैलास नागणे, नाना कोष्टी, प्रेमा गुजराथी, अशोक देशमुख, दिपाली देशमुख, कलावती पवार, संध्या कोष्टी, यशोदा पवार यासह इतर कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.

Protected Content