मुंबई प्रतिनिधी | चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्रालयात मास्क न घातल्याबद्दल दोनशे रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी हा दंड भरून आपण केलेल्या स्टींग ऑपरेशनवर कारवाईसाठी तितकीच तत्परता दाखविण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, आमदार मंगेश चव्हाण हे मंगळवारी मंत्रालयात गेले होते. तेथून बाहेर पडत असताना त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना २०० रुपयांचा दंड केला. आमदार चव्हाण यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता दंड भरला.
दरम्यान, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी कायदा मोडल्याने कारवाई झाली. त्यात काही गैर नाही. मी माझ्या मतदारसंघात गरिबांना लुटणार्यांचे स्टिंग केले होते. या सरकारने त्यात लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी. मास्कसाठी दंड वसूल करण्यात जी तत्परता आहे तीच स्टींगवरील कारवाईबाबतही दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.