आमदार मंगेश चव्हाण कोरोना पॉझिटीव्ह; होम क्वॉरंटाईनचा निर्णय

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यापासून आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मैदानावर उतरून काम केले. त्यांनी तालुक्याच्या कान्याकोपर्‍यात रोग प्रतिकारकता वाढविणार्‍या औषधीच्या वाटपासह गरजूंना थेट घरपोच मदत केली. त्यांच्या मदतीचा हा पॅटर्न चांगलाच गाजला.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला आहे. आज त्यांनी स्वत: आपल्या फेसबुक पेजवरून याबाबतची घोषणा केली आहे. यात त्यांनी गत काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनीही तपासणी करून घेत स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मंगेश चव्हाण यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला होम क्वॉरंटाईन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच अनेकांनी त्यांची भ्रमणध्वनीवरून चौकशी करून लवकर बरे होण्याच्या शुभकामना व्यक्त केल्या आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली दिलेली पोस्ट फेसबुक पेजवरून प्रसिध्द करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

 

mla mangesh chavan,mla mangesh chavan chalisgaon, mangesh chavan, mangesh chavan chalisgaon, mla mangesh chavan bjp, chalisgaon corona, chalisgaon corona updates, chalisgaon corona news, chalisgaon corona positive, chalisgaon

Protected Content