चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खेरडे शिवारातील शेतात शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील खेरडे शिवारात असलेल्या दादासाहेब नथू पाटील यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या एल-टी लाईनचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.
या आगीत दीड एकरशेतातील मका जळून खाक झाला. यात सुमारे ४० ते ५० क्विंटल मका जळाला आणि दीड एकरचे पूर्ण ठिबक करून जळून खाक झाले संपूर्ण दिड एकर चारा जळाला आहे. या शेतकर्याचे यामुळे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.