खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनावर प्रभावी ठरलेल्या कोव्हीशिल्ड लसीकरणाची मोहीम सुरू असून टप्याटप्याने लस सर्वांना दिली जात आहे. दरम्यान, आज खासदार उन्मेष पाटील यांनी येथील महात्मा फुले जनआरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली. 

यावेळी सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.

कोरोना प्रतिबंधक लस हि टप्याटप्याने सर्वांना टोचली जात आहे. जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथील महात्मा फुले जनआरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटरात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. दरम्यान लस निर्मितीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार मानत. सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी पंचायत समितीचे मा. सभापती संजय पाटील, पं. स. मा. सदस्य दिनेश बोरसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, भुषण पाटील, जाधव मॅडम, कुंदन मॅडम, अमोल मराठे, आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content