परमपूज्य बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा यांची जयंती उत्साहात ; युवानेते मंगेश चव्हाण यांची उपस्थिती

69259130 673257836490681 4234489393353588736 n

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य बालब्रह्मचारी सिदाजी आप्पा यांची जयंती चाळीसगाव येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. या मिरवणुकीत युवानेते मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला.

 

 

गवळी समाज हा वर्षानुवर्षे गाई, म्हशी व पशूंची सेवा करत आलेला आहे. गवळी समाज हा भगवान श्रीकृष्णांच्या युगापासून अस्तित्वात आहे. आणि समाजात दुध, दही, तूप पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम हा समाज आजतागायत करत आहेत. अशा या गवळी समाजासाठी व समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील असे आश्वासनही दिले. यावेळी गवळी समाजाचे वडीलधारी-ज्येष्ठ तसेच पंच मंडळी उपस्थित होते. तसेच युवानेते मंगेश चव्हाण यांच्यासह रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, नगरसेवक भास्कर पाटील, मनोज गोसावी आदी उपस्थित होते.

Protected Content