कापसाच्या गोडाऊनला आग : दोनशे क्विंटल कापूस खाक

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिलखोड येथील एका कापसाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने सुमारे दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. अंदाजे दहा ते पंधरा लाखांचा नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचे हे कापुस असल्याचे सांगितले जात असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग एवढी भीषण होती की, क्षणार्धात होतेच नव्हते झाले.

या घटनेत गोडाऊनमधील तब्बल दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाले आहे. तब्बल १० ते १५ लाख रुपयांचा नुकसान वाणी यांना झाले आहे. तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मेहूणबारे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना मिळताच लागलीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Protected Content