चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील घाटरोड परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील घाटरोड भागात मुस्लिम समाजाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून, तसेच गुरांची कत्तल करतो अशी गोपनीय माहिती पोलिसांना पुरवल्याच्या संशयाच्या कारणावरून दोन गटात ६ रोजी सायंकाळी हाणामारी झाली. यात शहर पोलिस ठाण्यात परस्परांच्या तक्रारीवरून एका गटाच्या आठ तर दुसर्या गटाच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पहिली फिर्याद शेख गफूर शेख हजरत नूर (वय ६५, रा. घाटरोड, छाजेड ऑईल मिलमागे) यांनी दिली आहे. यानुसार, समाज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून व फिर्यादीचा पुतण्या शेहजान शेख रसूल यास झालेल्या मारहाणीच्या कारणावरून, संशयितांनी तक्रारदाराला व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली. तसेच दगडफेक करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या हाणामारीत शेख गफुर शेख हजरत नूर, शेख सिकंदर शेख गफूर, शेख रसूल शेख हसरतनूर, शेख इम्रान शेख शब्बीर, शेख बिस्मिल्ला शेख हसरत नूर हे पाच जण जखमी झाले. याप्रकरणी संशयित फकीराबेग जमालबेग मिर्झा, राहील मिर्झा फकिरा मिर्झा, शाकील शेख शफी, अफरेज मिर्झा अजीज मिर्झा बेग, फकिरा बेग याचा भाचा नईम (रा. मनमाड), रियाज शेख चिराग शेख उर्फ प्रिन्स व मॉन्टी शेख अल्लाउद्दीन यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कलामबेग जमाल बेग मिर्झा (वय ७२, रा.नवेगाव, इस्लामपूरा) यांनी फिर्याद दिली. यात नमूद केले आहे की, गायींची कत्तल करतो अशी गोपनीय माहिती पोलिसांना पुरवली या संशयावरून संशयित गफूर शेख हजरत नूर याने तलवारीने मारहाण केली. तर सिकंदर शेख गफूर शेख, बिस्मिल्ला शेख उर्फ छोटू पहेलवान, इम्रान शेख शब्बा पहेलवान, सलमान शेख शब्बा पहेलवान व शब्बीर शेख हजरत नूर यांनी लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने फिर्यादी बेग व त्यांचा पुतण्या तसेच भाऊ यांना मारहाण केली. याप्रकरणी गफुर शेख हजरत नूर, सिकंदर शेख गफूर शेख, बिस्मिल्ला शेख उर्फ छोटू पहिलवान, इम्रान शेख शब्बा पहेलवान, सलमान शेख शब्बा पहेलवान व शब्बीर शेख हजरतनूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.