जळगाव प्रतिनिधी । शेताच्या बांधावरून एकाला आठजणांनी मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज झाले असून तीन जणांना सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा तर इतर पाच जणांची निर्दोष ठरविले आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अतुर्ली येथील फिर्यादी प्रकाश केशव महाजन रा. अतुर्ली ता.पाचोरा यांच्या शेतात बेकादेशिररित्या शिरणारे माधव चिंधा पाटील (वय-38), बाबुलाल गोबजी पाटील (वय-78), हिरामण चिंधा पाटील (वय-46), राहुल धनराज पाटील (वय-28), नामदेव कैलास पाटील (वय-22), चिंधा गोबाजी पाटील (वय-85), प्रशांत शिवाजी पाटील (वय-31) आणि भाऊसाहेब ओंकार पाटील सर्व रा. अंतुर्ली ता.पाचोरा यांनी फिर्यादी यांच्या पत्नी विजया प्रकाश महाजन यांना लाठ्याकाठ्यानी बेदम मारहाण करून गंभीर जखमी करत जिवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना 27 मे 2012 रोजी घडली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला वरील आठ जणांविरोधात जीवे ठार मारण्याची प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी एस.आर.ब्राम्हणे यांनी दोषारोपण सादर केले. या प्रकरणात 9 साक्षिदार तपासण्यात आले. यातील आरोपी बाबुलाल गोबजी पाटील हे मयत झाले आहे. पुराव्याअंती न्या.पी.वाय.लाडेकर यांनी राहुल पाटील, माधव चिंधा पाटील आणि हिरामण चिंधा पाटील यांना दोषी ठरवत तिघांना भादवी 323, 447 आणि 506 प्रमाणे दोषी ठरवत तिघांना प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावास आणि भादवीच्या अनुक्रमे 500,200 आणि 500 रूपये दंड ठोवण्यात आला आहे. तर इतर पाच जणांची निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.