नगरदेवळ्यात लाचखोर तलाठीसह कोतवालास अटक

जळगाव प्रतिनिधी । यंदा अवकाळी पावसामुळे झालेल्या पिंकाची पाहणी करून पंचनामा करण्याच्या मोबदल्यात 5 हजाराची मागणी करणाऱ्या कोतवालासह तलाठीसह आज एसीबीने रंगेहात पकडले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे शेती असून यंदा अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाचे आदेश असतांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ठिकठिकाणी पंचनामा करण्यात येत आहे. दरम्यान तक्रारदार यांचे देखील शेतातील नुकसान झाले होते. शेतात मका व कपाशी पीक लावलेले होते, अवकाळी पावसामुळे सदर पिकाचे झालेले नुकसान भरपाईचा पंचनामा करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे संशयित आरोपी नगरदेवळा येथील तलाठी मिलींद जयवंत बच्छाव (वय-55) रा. कजगाव ता.भडगाव यांनी कोतवाल विलास उर्फ कैलास काशिनाथ धिवरे (वय-45) रा.नगरदेवळा ता.पाचोरा यांच्यामार्फत 5 हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने सापळा रचून आज पंचासमक्ष 5 हजाराची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. दोघांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content