चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील १८ खुल्या जागा विकसित होणार असून यासाठी १० कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच चाळीसगाव शहरात नगरविकास विभागामार्फत ५ कोटी मंजूर निधीतुन हॉटेल दयानंद ते खरजई नाका, अभिनव शाळा ते धुळे बोगदा, चौधरी वाडा ते सुवर्णाताई नगर, धुळे रोड डीवायएसपी ऑफिस ते यशनगरी या ४ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरु असून आता पुन्हा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी संक्रांतीच्या मुहूर्तावर शहर वासियांना विकासकामांची गोड भेट दिली आहे.
नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील १८ खुल्या जागा (ओपन प्लेस) च्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या खुल्या जागा आता मोकळा श्वास घेणार आहेत. घाणीच्या साम्राज्यात व विविध समस्यांच्या गर्तेत असणार्या या जागांचे अत्याधुनिक असे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. लवकरच या कामांच्या निविदा होऊन प्रत्यक्षात कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली आहे.
या विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने १० कोटींच्या निधीतून सुशोभीकरणासाठी मंजूर झालेल्या १८ खुल्या जागा व त्यांचा मंजूर निधी पुढीलप्रमाणे
१ – शास्त्रीनगर घृष्णेश्वर हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे ६५ लाख
२ – धुळे रोड जोंडीअर शोरूम मागील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
३ – शास्त्रीनगर दुर्गादेवी मंदिराजवळील खुली जागा विकसित करणे. – ६५ लाख
४ – यश नगरी मधील खुली जागा विकसित करणे. ६० लाख
५ – हिरापूर रोड इच्छादेवी नगर मधील खुली जागा विकसित करणे. ६० लाख
६ – हिरापूर रोड गट नंबर ३१५/१/२/३ मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
७ – बंजारा कॉलनी हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. ६० लाख
८ – मालेगाव रोड वृंदावन नगर मधील खुली जागा विकसित करणे. ६० लाख
९ – नारायण वाडी देवकर मळ्यालगत खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१० – करगाव रोड महाराणा प्रताप हाउसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ५५ लाख
११ – धुळे रोड स्वामी समर्थ नगर मधील खुली जागा विकसित करणे. ६० लाख
१२ – धुळे रोड पुंशी पेट्रोल पंप लगत खुली जागा विकसित करणे. ५५ लाख
१३ – नवलेवाडी हनुमान मंदिरात जवळील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१४ – हुडको मधील वाल्मिक नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१५ – घाट रोड गोकुळधाम नगर मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
१६ – सुवर्णाताई नगर गट नंबर ३२३/३/अ मधील खुली जागा विकसित करणे. ५५ लाख
१७ – प्रेरणा हाऊसिंग सो. सा. मधील खुली जागा विकसित करणे. – ५५ लाख
१८ – करगाव रोड लगत वृंदावन कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे. – ५० लाख
पवार