मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आज २३ सप्टेंबर सोमवारी रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला आहे. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आले तेव्हापासूनच भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. पण काही कारणांमुळे ते त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज होते.
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. दरम्यान गोगावले यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरातील एसटी बसस्थानकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले.