सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली ज्वारी ठेवण्यासाठी रीतसर भाडे करार यावल तहसीलदार यांनी केलेला आहे. त्यानुसार मागील गत काळात सन २०१४ ते २०१७ या कालावधीत सदर गोडाऊन घेतलेले होते. त्याचे ठरलेले भाडेची रक्कम अद्याप मिळालेली नाही.
अनेक वर्षापासून भाडे मिळण्याबाबत जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार व पायपीट सुरू असल्याचे माहिती सभापती नरेंद्र नारखेडे यांनी दिली. यासाठी जळगाव जिल्हयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे व संचालक तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. पालकमंत्री या नात्याने त्यांना गोडाऊन भाडे मिळवण्यासाठी साकडे घातले आहे. याबाबत तत्काळ महसूल आयुक्तांना याबाबत सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. याबाबत शेतकी संघ संचालक मंडळाने आभार मानले आहे.