अमोल शिंदें यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यासह शहरात नगरपालिका, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने भारतीय जनता पार्टीचे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात जोरदार इनकमिंग सुरू आहे. काल कृष्णापुरी भागातील कार्यकर्त्यांनी अमोल शिंदें यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून पुन्हा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला.

 

दि.१२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो खा. शरद पवार यांच्या वाढदिवशी भाजपाने राष्ट्रवादीला मोठा धक्का देत एकेकाळी बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कृष्णापुरी परिसरातील कट्टर कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतला आहे. तसेच पाचोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून गळतीचे ग्रहण लागलेल्या शिवसेनेचा भक्कम गड देखील काल पुन्हा एकदा ढासळला आहे. सेनेतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यां पाठोपाठ आता कृष्णापुरी भागांतील कार्यकर्त्यांनी काल भाजपात प्रवेश करत आता शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच बल्लाळेश्वर फाउंडेशनचे संस्थापक हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी देखील भाजपात पुन्हा घरवापसी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पाचोऱ्यात शिवसेनेसह राष्ट्रवादीसाठी देखील ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यात महाविकास आघाडी विरोधात भाजपाच्या अमोल शिंदे यांचे नेतृत्व प्रभावी व भक्कम ठरतांना दिसत आहे. तसेच ग्रामीण भागांसह शहरांतील प्रत्येक प्रभागात भाजपाने स्टिंग ऑपरेशन सुरू केले असून पदाधिकऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचे गेल्याकाही दिवसांपासून मोठया प्रमाणावर प्रवेश होतांना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आजी – माजी आमदारांना शह देण्यास भाजपाचे अमोल शिंदे हे पूर्णपणे यशस्वी होतांना दिसत असल्याची चर्चा पाचोरा – भडगाव तालुक्यात सुरू आहे.
यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बोलतांना सांगितले की, पाचोरा तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरिता व तरुणांच्या उज्वल भविष्याकरिता व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता फक्त अमोल शिंदे यांच्या मध्येच आम्हाला एक दूरदृष्टी असलेले कार्यतत्पर व कुशल नेतृत्व दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करित आहोत. तसेच प्रवेश करणाऱ्या सर्वांचा भाजपात योग्य तो सन्मान राखुन महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जातील व प्रत्येकाच्या सुख- दुःखात भाजपा पक्ष पूर्ण ताकतीने सोबत उभा राहील असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर (पाटील) यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे ह्या परिवर्तनाच्या लाटेत सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केलेत. तसेच भाजपाचे जेष्ठ सदस्य मा.नगरसेवक तथा मा.शहराध्यक्ष रवि पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त करीत पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, तालुका सरचिटणीस संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार, शहर उपाध्यक्ष हेमंत चव्हाण, शहर सरचिटणीस दीपक माने, भाजयुमो अध्यक्ष समाधान मुळे, जगदीश पाटील, विरेंद्र चौधरी, भैया पाटील, भैया ठाकूर, राहुल गायकवाड, लकी पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content