नवी दिल्ली | केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात दिवंगत लष्करप्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषणने गौरविण्यात आले आहे. तर राज्यातील दहा मान्यवरांना पद्म पुरस्कारांचा सन्मान मिळाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सीडीएस बिपीन रावत यांना मरणोत्तरत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण, गायक सोनू निगमला पद्मश्री, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
१२८ पद्म पुरस्कारांमध्ये चार पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आह़े यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े
संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल बिपीन रावत, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग आणि राधेश्याम खेमका (साहित्य-शिक्षण) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आह़े
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, प़ बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, कृष्णा इल्ला, सुचित्रा इल्ला, राजीव मेहऋषी, रशीद खान (कला) मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यासह १७ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आह़े
प्रल्हाद राय अग्रवाल (व्यापार-उद्योग) नजमा अख्तर (साहित्य-शिक्षण), ज़े क़े बजाज (साहित्य-शिक्षण), ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा (भालाफेकपटू), नारायण कुरूप (साहित्य-शिक्षण), अवनी लेखारा (नेमबाज), रामसहाय पांडे (कला), शिवनाथ मिश्रा (कला), पद्मजा रेड्डी (कला) यांच्यासह विविध क्षेत्रातील १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आह़े
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत़ . हिंदूीतील प्रसिध्द पार्श्वगायक सोनू निगम यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दूरदर्शनवर गाजलेल्या ‘चाणक्य’ या मालिकेचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेले डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.