रावेर प्रतिनिधी | तेली समाजाचे आराध्य दैवत संत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रावेर तेली समाजातर्फे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
रविवार, दि.२ जानेवारी रोजी येथील विखे चौकातील तेली पंच भुवन येथुन संताजी महाराज यांच्या मुर्तीची सजविलेल्या पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी ‘खिरवड’ येथील लहान मुलांचे भजनी मंडळ होते. शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, महात्मा गांधी चौक, डॉ.हेडगेवार चौक, मेन रोड, महाराजा अग्रसेन महाराज चौक, पाराचा गणपती विखे चौकमार्गे तेली पंच भुवन येथे मिरवणुकीची सांगता झाली.
राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गौ शाळेजवळ तेली समाज नियोजीत मंगल कार्यालयाच्या जागेत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात आमदार शिरिषदादा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवर, देणगीदार व सहकार्य करणा-यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी तिर्थप्रसाद व भंडारा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी भगवान चौधरी, नारायण चौधरी, लिलाचंद चौधरी, विलास चौधरी, नगरसेवक सूरज चौधरी, राजेंद्र महाजन, नगरसेविका शारदा चौधरी, हरीश गणवाणी, सुभाष चौधरी, सुनील चौधरी, संजय चौधरी, चंदु चौधरी, भुषण महाजन, अंबादास चौधरी, हिरामण चौधरी, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन पंकज चौधरी यांनी केले. यांच्यासह रावेर तेली समाज पंच मंडळातील सदस्य, समस्त तेली समाज बांधव, महिला मंडळ, संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथि उत्सव समिती सदस्य यांची उपस्थिती होती.