जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. यादिवशी सुर्याची किरणे जास्तीत – जास्त वेळ पृथ्वीच्या एका भागावर पडता त योग हा आपले दीर्घ आयुष्य दर्शवतो. मानवी जीवनात सुडौल आरोग्याचे खूप महत्व आहे. ५००० वर्षाहून जास्त परपरा असलेली ही योग विदया भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा एक अविभाज्य भाग आहे. योग केल्याने आपण शारिरीक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहतो. तणाव व चिंता दूर करण्यासाठी योग आपल्याला मदत करतो. या योगदिनाचे आयोजन हे एक दिवसापुरते न करता ते कायमस्वरूपी ठेवा आणि दर महिन्याच्या २१ तारखेला योगदिवस साजरा करा, असे मुख्या. रेखा पाटील यांनी मुलांशी बोलतांना सांगितले, योगशिक्षिका अर्चना गुरव व त्यांच्या टीमने मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवत सुर्यनमस्कार व काही योगाचे प्रकार विद्यार्थ्याकडून करून घेतले. यावेळी शिक्षण समन्वयक श्री चंद्रकांत भंडारी, उपशिक्षिका कल्पना तायडे, दिपाली चौधरी व चारुलता भारंबे, योगेश भालेराव या सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले.