धरणगावात भाजप व राष्ट्रवादीचा एकत्र जल्लोष

bjp ncp celebration

धरणगाव प्रतिनिधी । येथे आज फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी एकत्रीतपणे जल्लोष केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर राज्यभरात भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला असून राष्ट्रवादीत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमिवर, येथे मात्र दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्रीतपणे जल्लोष केला. यात भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, भीमराज पाटील, गटनेते कैलास माळी, शरद कंखरे, पुनीलाल महाजन, सुनील चौधरी, भालचंद्र महाजन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन व निलेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Protected Content